top of page

१ . डोंबेग्राम ते निधीवास.

Updated: Jun 28, 2023


ree

उत्तरार्ध काळात सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू डोंबेग्रामहून नेवाशाला आले तेव्हा प्रथम ‘चाचरमूद’ (बेलपिंपळगाव) येथे आसन झाले. पुढे काही अंतरावर असलेल्या ‘चौबारा’ येथे पहाटेच्या सुमारास आसन झाले. सांप्रत या जागेचा काहीच मागमूस लागत नाही. परंतु ही जागा बेलपिंपळगाव-नेवासा या दोन्हीमध्ये कुठेतरी असावी. येथून सर्वज्ञांनी नेवाशातच गावाच्या पश्चिम विभागी प्रवरेच्या उत्तर तटावर असलेल्या ‘कणेरेश्वर’ नावाच्या देवालयात बीजे केले. देवळाच्या चौकात आसन झाले. आणि कणेरेश्वराजवळच कुसुमेश्वराचे देऊळ होते--

‘‘निवासेया पश्चिमे गंगे उत्तरे कणेरेश्वरु : तयापूर्वे जवळीचि कुसुमेश्वरु :’’

तिथेही आसन झाले. मग येथून सर्वज्ञांनी मंडळिकांना पुरादित्याच्या मठात पाठविले.

कुसुमेश्वराच्या पश्चिमेकडे चतुर्मुखाचे देऊळ होते. त्या देवळाच्या दक्षिण दारवंठ्याला लागून भव्य घाट होता. हाच तो -

‘‘पुरादित्या वाव्यकोनी घाट : ते घाटी आसन :’’

त्या घाटावर सर्वज्ञांचे आसन झाले. आणि दक्षिणेकडे काही अंतरावर अग्निष्टिका होती, तिथेही आसन झाले. यानंतर सर्वज्ञांनी पुरादित्याच्या मठात बीजे केले.

Comments


Commenting on this post isn't available anymore. Contact the site owner for more info.

स्थानशोधनी

©2023 by स्थानशोधनी. Proudly created by Shri Devdatt Ashram, Jadhavwadi

bottom of page